महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Disabled Protest: शंभूराज देसाईंच्या घरासमोरील आंदोलनानंतर पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली, नेमके काय झाले? - पालकमंत्री शंभूराज देसाई

दिव्यांगांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर केलेले अर्धनग्न आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीने मोडीत काढले. मात्र, हे आंदोलन साताऱ्याच्या पोलीस निरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. त्यांची मंगळवारी रात्रीच नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

disabled Protest
साताऱ्यात दिव्यांगाचे आंदोलन

By

Published : Jun 7, 2023, 1:57 PM IST

साताऱ्यात दिव्यांगाचे आंदोलन

सातारा :सध्या 'शासन आपल्या दारी योजना' राबवण्यात येत असताना दिव्यांगांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत आहे. दोन महिने झाले तरी दिव्यांग व्यक्तींना सातारा तहसील कार्यालयात उत्पन्नाचे दाखले दिले जात नाहीत. त्यांची अडवणूक केली जात आहे, असा आरोप दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने निवेदनात केला आहे. याच अनुषंगाने दिव्यांगांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन केलेले आहे.



आत्मदहनाचा दिला होता इशारा :प्रत्येक वर्षी डॉक्युमेंटची गरज नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगण्यात आले होते. तरीही अडवणूक केली जात आहे. निवेदने देऊनही पालकमंत्र्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक घेतलेली नाही. हा दिव्यांगावर अन्याय आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला होता. त्यानुसार दिव्यांग बांधवांनी साताऱ्यात आंदोलन केले.



आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न : एका आंदोलकाने आत्मदहनाच्या उद्देशाने ज्वालाग्राही पदार्थाची बाटली आणली होती. पोलिसांनी ती बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस अधीक्षकांनी दिव्यांग बांधवांना चर्चेसाठी बोलावल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दिव्यांगानी केलेले हे आंदोलन पोलीस निरीक्षकाला चांगलेच भोवले आहे. आंदोलनात आंदोलक हे संतप्त होते. जोरदार घोषणाबाजी देखील करत होते.


पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली :दिव्यांग बांधवांनी अर्धनग्न आंदोलन करत पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बराच काळ आंदोलकांनी भर उन्हात पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या दिला होता. नंतर आंदोलन संपले. मात्र, रात्री पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला हे आंदोलन भोवल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Pune District Court : तीन वर्षाच्या अपंग मुलाने पोटगीसाठी थेट बापाच्या विरोधात दाखल केली याचिका; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
  2. Disabled Couples Marriage : पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी ; थाटामाटात झाले कन्यादान
  3. Self Immolation : सात अपंगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; जिल्हा परिषेदेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ABOUT THE AUTHOR

...view details