महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माथेफिरूकडून मायणी येथे वृद्धेवर अत्याचार - satara crime news

परिसरातील एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिलेवर अनोळखी युवकाने तिचे केस ओढून, डोके जमिनीवर आपटून हाताने मारहाण केली. तसेच तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचे 'सीसीटीव्ही फुटेज'द्वारे स्पष्ट झाले.

physical-abuse
physical-abuse

By

Published : Dec 11, 2020, 11:54 AM IST

सातारा - मायणी (ता. खटाव) येथे एका मनोरुग्ण वृद्ध महिलेवर रात्रीच्या वेळी एका अज्ञात तरुणाने अत्याचार केला. याबाबतची फिर्याद मायणी पोलीस दूर क्षेत्रातील पोलीस निरीक्षक योगेश सूर्यवंशी यांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट

मायणी येथील चांदणी चौकात एक वेडसर महिला जखमी अवस्थेत झोपली होती. तिच्या डोक्यास व तोंडास मार लागला होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस गेले असता तेथे सुमारे ६० ते ६५ वर्षे वयाच्या महिलेने रात्री एकाने जबरदस्ती केली असल्याचे सांगितले. परिसरातील एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिलेवर अनोळखी युवकाने तिचे केस ओढून, डोके जमिनीवर आपटून हाताने मारहाण केली. तसेच तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचे 'सीसीटीव्ही फुटेज'द्वारे स्पष्ट झाले.

संशयिताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे

संशयित युवकाने काळसर रंगाचा कोट व निळसर रंगाची पॅन्ट घातली होती. त्यांचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असावे, असे पोलिसांनी सांगितले. वडूजच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पालेकर यांनी मायणी येथे भेट घेऊन पीडित महिलेची विचारपूस केली. औषधोपचार करण्यासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेण्यात सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details