सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने घटले आहे. मात्र, लाॅकडाऊनच्या काळात दुचाकीतील पेट्रोल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. सध्या सातारकर या चोरट्यांमुळे त्रस्त आहेत.
लाॅकडाऊन: साताऱ्यात गंभीर गुन्ह्यांना रोख.. पण पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट - सातारा बातमी
लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल उपलब्ध होत नाही. त्यामुळे गल्लीबोळातून दुचाकी दामटवत फिरणाऱ्या युवकांचे अवघड झाले आहे. लाॅकडाऊनमुळे काळ्याबाजारात पेट्रोलला चांगला दर मिळत आहे. मागणीही मोठी आहे. त्यामुळे भुर्ट्या चोरट्यांनी आपला मोर्चा पेट्रोल चोरीकडे वळवला आहे.
हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल उपलब्ध होत नाही. त्यामुळे गल्लीबोळातून दुचाकी दामटवत फिरणाऱ्या युवकांचे अवघड झाले आहे. लाॅकडाऊनमुळे काळ्याबाजारात पेट्रोलला चांगला दर मिळत आहे. मागणीही मोठी आहे. त्यामुळे भुर्ट्या चोरट्यांनी आपला मोर्चा पेट्रोल चोरीकडे वळवला आहे. पार्कींग, अरुंद गल्ल्या, सहजी न दिसणाऱ्या जागा अशा ठिकाणी उभ्या असणाऱ्या दुचाकीतील पेट्रोलचा पाईप काढून पेट्रोल पळवले जात आहे.
लाॅकडाऊनमुळे आधिच सर्वसामान्यांना पेट्रोलची चणचण भासत आहे. अत्यावश्यक अथवा आणीबाणीच्या प्रसंगी वाहन हाताशी असावे म्हणून लोक मोटारसायकलमध्ये थोडेफार पेट्रोल बाळगून आहेत. त्यावरच चोरटे डल्ला मारू लागले आहेत. मोटारसायकलमधून पेट्रोल न निघाल्यास दुचाकीची तोडफोड करुन नुकसानही केले जाते. शे-दोनशे रुपयांच्या पेट्रोलसाठी कोणी पोलिसांत जात नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावते आहे.
या चोरांमध्ये १५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. व्यसनांच्या विळख्यात अडकलेले केवळ अशिक्षितच नव्हे तर चांगल्या कुटुंबातून आलेले युवकही आढळत असल्याचे पोलिसांचे निरिक्षण आहे.