महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Petrol Dealers : डिलर्सकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी-विक्री आजपासून बंद, तेलासाठी पंपांवर वाहनांच्या रांगा - पेट्रोल खरेदी बंद

पेट्रोलियम डिलर्सनी ( Petrol dealers will stop petrol diesel purchase ) मंगळवारपासून (दि. 31 मे) पेट्रोल-डिझेल ( Petrol dealers news ) खरेदी-विक्री बंदचे देशव्यापी आंदोलन छेडले आहे. यामुळे सोमवारी रात्रीपासून पेट्रोल ( Petrol purchase by petrol dealers ) पंपांवर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

petrol dealers will stop petrol diesel purchase
पेट्रोल खरेदी

By

Published : May 31, 2022, 6:52 AM IST

कराड (सातारा) - पेट्रोलियम डिलर्सनी ( Petrol dealers will stop petrol diesel purchase ) मंगळवारपासून (दि. 31 मे) पेट्रोल-डिझेल ( Petrol dealers news ) खरेदी-विक्री बंदचे देशव्यापी आंदोलन छेडले आहे. यामुळे सोमवारी रात्रीपासून पेट्रोल ( Petrol purchase by petrol dealers ) पंपांवर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधनाचे दर बदल करताना डिलर्सना विश्वासात न घेणे, नुकसानीचा विचार न करणे, आणि इतर कारणांमुळे खरेदी विक्री बंद ठेवण्यात आल्याचे डिलर्सकडून सांगण्यात आले.

माहिती देताना पेट्रोल पंप मालक

हेही वाचा -संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट

पेट्रोलियम डिलर्सच्या म्हणण्यानुसार, वर्षानुवर्षे 24 तास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आम्ही राबतो. नोदबंदीसारख्या निर्णयानंतरही शासनाला सहकार्य केले. नंतर प्रशासकीय चौकशीलाही सामोरे जावे लागले. कोविडसारख्या परिस्थितीत जोखीम स्विकारून अहोरात्र सेवा दिली. पण, या बदल्यात आम्हाला काय मिळाले? गेल्या पाच वर्षांत आमच्या भांडवली गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ झाली. मात्र, आमचे मार्जिन वाढले नाही. चुकीच्या दर बदलाच्या धोरणांमुळे अनेकदा आम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. दर बदल करताना डिलर्सना विश्वासात घेतले जात नाही, असे डिलर्सचे म्हणणे आहे.

आमच्या नुकसानीचाही विचार केला जात नाही. पेट्रोल पंप कर्मचार्‍यांसाठी कोणतेही विधायक धोरण नाही. आमच्या त्यागाबद्दल सर्व व्यवस्था कायमच उदासीन राहिल्या आहेत. यामध्ये पेट्रोल पंप डिलर्सची कायमच उपेक्षा होत आलेली आहे. या सर्वाच्या निषेधार्थ मंगळवारपासून (दि. 31 मे) पेट्रोल, डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली असल्याचे डिलर्सकडून सांगण्यात आले. दरम्यान, तेल खरेदी-विक्री बंदच्या निर्णयामुळे वाहनधारकांनी सर्वच पंपांवर रांगा लावून तेल खरेदी केले. डिलर्सच्या या मागण्यांबाबत तोडगा निघणार का? याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -कॉलेजवरून घरी येताना सख्ख्या चुलत बहिणींच्या दुचाकीला कारची धडक, एकीचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details