महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच एकाची कोयत्याने वार करून हत्या - पोलीस ठाण्यात खून

सातारा पोलीस ठाण्याच्या आवारात एकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. प्रेयसीच्या वादातून ही घटना घडली आहे.

Satara police station
सातारा तालुका पोलीस ठाणे

By

Published : Jun 4, 2020, 10:35 PM IST

सातारा - प्रेयसीच्या वादातून आज गुरूवारी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच एकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दुसर्‍या जखमीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यामध्येच खून होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे. सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर) असे मृताचे नाव आहे. तर, रामचंद्र तुकाराम दुबळे (रा. मतकर कॉलनी) हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेत हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रामचंद्र दुबळे याची पहिली दोन लग्न झाली आहेत. आता त्याचे दुसऱ्या एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेश कांबळे यांच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामाला माहिती दिली. त्यानंतर रामचंद्रने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहण केली. तीन दिवसांपूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने आज दोघांनाही तालुका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यावेळी सुरेश कांबळे याने सोबत आणलेल्या कोयत्याने रामचंद्र दुबळेवर पोलिसांसमोरच खुनी हल्ला केला. कांबळेच्या हातून निसटलेला कोयता घेऊन रामचंद्र दुबळेने कांबळेच्या डोक्‍यात, हातावर सपासप वार केले. रुग्णालयात नेईपर्यंत सुरेश कांबळेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details