महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजिंक्यतारा किल्ल्यावरून पडलेला व्यक्ती रात्रभर होता दरीत, रेस्क्यू टीमने काढले बाहेर - Ajinkyatara Fort satara

फिरायला गेल्यानंतर पाय घसरून अजिंक्यतारा ( Person fell from Ajinkyatara Fort ) किल्ल्यावरून शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी खोल दरीत ( Ajinkyatara Fort satara ) पडलेल्या ६४ वर्षांच्या व्यक्तीला शिवेंद्राराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने १४ तासांनी दरीतून बाहेर काढण्यात यश आले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव आहे.

person fell from Ajinkyatara Fort
अजिंक्यतारा किल्ल्यावरून व्यक्ती दरीत पडली

By

Published : Aug 6, 2022, 2:09 PM IST

सातारा - फिरायला गेल्यानंतर पाय घसरून अजिंक्यतारा ( Person fell from Ajinkyatara Fort ) किल्ल्यावरून शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी खोल दरीत पडलेल्या ६४ वर्षांच्या व्यक्तीला शिवेंद्राराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने १४ तासांनी दरीतून बाहेर ( Ajinkyatara Fort satara ) काढण्यात यश आले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेस्क्यू करतानाचे दृश्य

हेही वाचा -Eco Friendly Ganesh Utsav 2022 : 'किसान विघ्नहर्ता' कोल्हापूरातील एका शाळेत साकारल्या; गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती

सायंकाळी फिरायला गेल्यानंतर पडले दरीत -साताऱ्यातील हणमंत जाधव हे शुक्रवारी सायंकाळी किल्ले अजिंक्यतारावर फिरायला गेले होते. त्यावेळी पाय घसरून ते दरीत पडले. रात्रीचा अंधार आणि कोसळणाऱ्या पावसात तब्बल १४ तास ते तेथेच पडून होते. एक व्यक्ती दरीत पडली असल्याची बाब शनिवारी सकाळी व्यायामाला गेलेल्या लोकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. अथक प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अंधार आणि पावसात रात्रभर होते दरीत -हणमंत जाधव हे सायंकाळी दरीत पडल्याचे कोणालाही कळले नाही. अंधार आणि पावसात संपूर्ण रात्रभर ते दरीतच होते. ही बाब आज सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे, रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने हणमंत जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा -Gram Panchayats Result: सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी अन् शिंदे गटाचा विजय; कॉंग्रेस, शिवसेनेची पाटी कोरी

ABOUT THE AUTHOR

...view details