महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अ‌ॅट्रोसिटी'ची भीती घालून ८ लाखांची खंडणी मागणाऱ्याला अटक; शाहूपुरी पोलिसांची कारवाई - one arrested for ransom

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवत ८ लाख ४० हजारांची खंडणी उकळणा-या संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबात शुक्रवारी तक्रार दाखल झाली होती. संशयिताने आणखी २ लाख रुपयांची मागणी केली होती.

satara latest news
सातारा लेटेस्ट न्यूज

By

Published : Sep 5, 2020, 3:45 PM IST

सातारा - अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‌ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या व्यक्तीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. ८ लाख ४० हजार रुपयांची खंडणी घेऊनही २ लाखांची मागणी करणाऱ्या चंद्रकांत दादासाहेब साठे उर्फ बाळू साठे (वय ३५, रा. शाहू बोर्डींगजवळ, व्यंकटपूरा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

शंकरराव गुलाबराव निंबाळकर (रा .५२ गडकर आळी, शाहूपुरी) हे २०१५ सालापासून कोटेश्वर मंदिरात भजनासाठी जातात. तेथे बाळू साठे हा ढोलकी वाजवण्यास येत असे. दोघांची तेथे ओळख झाली. २०१८ मध्ये बाळूने शंकरराव निंबाळकर यांच्याकडे भाजीच्या व्यवसायासाठी ३ लाख रुपये मागितले. निंबाळकर यांनी देण्यास नकार दिला असता बाळूने त्यांना पैसे दिले नाहीत तर, तुमच्यावर अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. खोटा गुन्हा नोंद होण्याच्या भीतीपोटी निंबाळकर यांनी बाळूला ३ लाख रुपये दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा-खवले मांजर तस्करी प्रकरणातील मुख्य संशयित निघाला वन्यजीव आणि सर्परक्षक!

साठे याने अ‌ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच निंबाळकर व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. कोल्हापूरच्या करवीर पोलीस ठाण्यात अ‌ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तो माघारी घेण्यासाठी साठे पैशांची मागणी करत असे. सामाजिक पत धोक्यात येईल, या भीतीपोटी निंबाळकर यांनी साठे याला ८ लाख ४० हजार रुपयांची खंडणी दिली होती.

शुक्रवारी (४ सप्टेंबर) साठे याने पुन्हा २ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर शंकरराव निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बाळू साठेला अटक करण्यात आली. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे हवालदार हसन तडवी, शैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनील मोहरे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details