महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Udayanraje Bhosale: जनतेने रिटायर केलेल्यांनी आम्हाला सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा; उदयनराजेंचे प्रत्त्युत्तर - नागरिकांची साथ कोणाला

Udayanraje Bhosale: जनतेने ज्यांना नगरपालिकेतून रिटायर केले आहे. त्यांनी सातारा विकास आघाडीला रिटायरमेंट घेण्याचा घेण्याचा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांचा रियल इस्टेटचा धंदा कमी झाला असल्यास त्यांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरू करावा, असे प्रत्त्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

By

Published : Nov 18, 2022, 3:25 PM IST

सातारा: जनतेने ज्यांना नगरपालिकेतून रिटायर केले आहे. त्यांनी सातारा विकास आघाडीला रिटायरमेंट घेण्याचा घेण्याचा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांचा रियल इस्टेटचा धंदा कमी झाला असल्यास त्यांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरू करावा, असे प्रत्त्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

आमदारांचे दोन्ही डगरीवर हात:नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काहीच करत नसल्याची बोंब मारणारे कास जलपूजनाशी सातारा विकास आघाडीचा काय संबंध, अशी गरळ ओकत होते. प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत, असे म्हणणे हा नथीतून तीर मारण्याचा प्रकार आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत. कुरतडलेली दाढी आणि मिशांवर ताव मारण्यापेक्षा कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. यांच्यासारखे पोटात एक आणि ओठात एक असे आमचे नसते, असा उपरोधिक टोला उदयनराजेंनी मारला आहे.

अडीच वर्षे कोणाची:भाजपमध्ये असताना मागील अडीच वर्ष तुम्ही कोणाची टीमकी वाजवली. हे जनतेला माहित आहे. आता तुमची निष्ठेची नाटके सुरू झाली आहेत. आम्ही भाजपमध्ये जाणार याची काणकुण लागताच, तुम्ही भाजपला जवळ केले. त्यामुळेच आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय लांबवला होता. तुम्ही भाजपात गेला म्हणून आम्हीही गेलो, असा चुकीचा अर्थ काढू नका.

नागरिकांची साथ कोणाला: विरोधकांच्या बडबडीला आमच्या आणि जनतेच्या लेखी काडीची किंमत नाही. पेन्शनर सिटीचे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी सातारा विकास आघाडी वचनबद्ध आहे. नागरिकांची साथ कोणाला मिळेल. हे येणारा काळच ठरवेल, असे उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details