कराड (सातारा) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत घरात राहून करण्याचे आवाहन शासनाने केले होते. या अनुषंगाने पोलिसांनी हॉटेल्स, ढाबे रात्री 11 नंतर बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे कराडमध्ये सामसूम पहायला मिळाली. नाकाबंदीवेळी मद्य प्राशन करून गाडी चालविणार्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत घरात राहून करा, असे आवाहन शासनाने केले होते. या अनुषंगाने पोलिसांनी हॉटेल्स, ढाबे रात्री 11 नंतर बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. कराडमधील मुख्य चौकांसह शहरात येणार्या आणि बाहेर जाणार्या मार्गांवर नाकाबंदीही केली होती. त्यामुळे तरूणांच्या हुल्लडबाजीला चांगलाच चाप बसला. परिणामी रस्त्यांवर सामसूम पहायला मिळाली. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये काही जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे गुन्हेही दाखल झाले आहेत.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीसुध्दा नववर्षाच्या पूर्वसंध्येला सातार्यात फेरफटका मारून कायदा, सुव्यवस्थेची पहाणी केली. त्यांच्या समवेत सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल होते. सातार्यातील पोवई नाका, मोती चौक, राजवाडा, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे भेट देऊन गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. पोलीस मुख्यालयातून जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला वायरलेसवरून कायदा व सुव्यवस्था कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. याच बरोबर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.