सातारा - प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या देशभक्तीपर समूह गीत-गायन स्पर्धेला शुक्रवारी सकाळी 9 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाच्या परिसरात प्रारंभ झाला. कराड येथील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रजासत्ताकदिनानिमित्त कराडात देशभक्तीपर समूह गीत-गायन स्पर्धेला प्रारंभ - पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान
कराडमधील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची समूह-गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी गीत-गायन स्पर्धेस प्रारंभ झाला.
कराडमधील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची समूह-गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी गीत-गायन स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त दिलीप चव्हाण, राजेंद्र माने, डॉ. विजयकुमार साळुंखे, डॉ. सौ. रेश्मा कोरे, सौ. शोभा पाटील, संयोजन समिती सदस्य प्रा. एस. ए. डांगे, प्रा. रामभाऊ कणसे, मुकूंद कुलकर्णी, अबुबक्कर सुतार, संभाजीराव पाटील, ए. एन. मुल्ला, नरेंद्र पवार या मान्यवरांसह स्वच्छ शाळा-सुंदर शाळा पाहणी पथकातील सदस्य महालिंग मुंढेकर, चंद्रशेखर खेतमर, प्रकाश बापट, अशोक कुलकर्णी, सौ. अंजली कुलकर्णी उपस्थित होते.