महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण पोलीस ठाण्याच्या चालकाला कोरोनाची लागण; संपर्कातील अनेकांचा जीव टांगणीला - Patan police station driver corona positive

पाटण पोलीस ठाण्यातील चालक कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांचे अहवाल येईपर्यंत अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. चालकाच्या पत्नीला याआधी कोरोनाची लागण झाली होती.

Patan police station
पाटण पोलीस ठाणे

By

Published : Jul 29, 2020, 9:44 AM IST

सातारा - पाटण पोलीस ठाण्यातील चालक कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने आता पाटण पोलीस ठाण्यासह, उप विभागीय पोलीस कार्यालय, मल्हारपेठ दुरक्षेत्र संबंधित सर्व पोलीस ठाण्याचे धाबे दणाणले आहेत. संबधित चालकाच्या संपर्कातील सात पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने मंगळवारी घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश असून, सर्व अहवाल बुधवारी रात्री येणार आहे.

चालकाच्या संपर्कातील अनेक कर्मचाऱ्यांना तातडीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु आता या कर्मचाऱ्यांचे अहवाल येईपर्यंत अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. चालकाची पत्नी या अगोदर कोरोनाबाधित सापडली त्यानंतर तातडीने चालकाला हाय रिस्कमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला व तो पाॅझिटिव्ह निघाला. सध्या संबंधित चालक व त्यांच्या पत्नीवर कराड येथील रूग्नालयात उपचार सुरू आहेत. तथापी गेल्या तीन दिवसांपासून संबंधित चालक पाटण येथे कामावर आलेला नाही.

परंतु त्या अगोदर त्या चालकासोबत मल्हारपेठ दुरक्षेत्रातील शिक्षित पोलीस उप निरिक्षक व पाटण पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी रात्र गस्त आदीसह प्रवास व कामकाज केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी संबधित चालकाच्या अती संपर्कातील पहिल्यांदा सात व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर इतर कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details