कराड (सातारा) -माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पाटण नगरपंचायतीवर ( Patan Nagar Panchayat Election ) आपले वर्चस्व कायम राखत शिवसेना आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना ( Minister Shambhuraje Desai ) धक्का दिला आहे. शिवसेनेला मागील निवडणुकीएवढेच 2 जागांवर समाधान मानावे ( Nagar Panchayat Election Shivsena Won 2 Seat ) लागले. काँग्रेसला आणि भाजपला पूर्ण पॅनेलही उभे करता आले नव्हते. काॅंग्रेसच्या सहाही उमेदवारांची अनामत जप्त झाली. तर भाजप आणि अन्य बंडखोरही पराभूत झाले.
शिवसेना धनुष्यबाणावर, तर राष्ट्रवादी लढली वेगवेगळ्या चिन्हांवर
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या आमदार शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवली. मात्र, देसाई यांचे पारंपारिक विरोधक विक्रमसिंह पाटणकर ( Former Minister Vikramsingh Patankar ) यांनी पक्षाच्या चिन्हाऐवजी मैत्रीपूर्ण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. इतर पक्ष, संघटनेतील इच्छुकांनाही त्यांनी पॅनेलमध्ये सामावून घेतले. त्यामुळे पक्षीय चिन्हावर निवडणूक लढणे त्यांनी टाळल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली. शंभूराजे देसाई यांनी देसाई गट म्हणून न लढता शिवसेनेच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यास प्राधान्य दिले. पाटण नगरपंचायतीच्या निकालात पाच वर्षापुर्वीच्या निकालाचीच पुनरावृत्ती झाली आहे. मागील वेळेसही देसाई गटाला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यात गृहराज्यमंत्र्यांना वाढ करता आली नाही.