कराड (सातारा) - व्हॉटस्अॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ क्लिप टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक सचिन कुंभार यास पाटण पोलिसांनी अटक आहे. तसेच न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत-

पाटण नगरपंचायतीचा विद्यमान नगरसेवक आणि नामांकित शाळेत क्रीडा शिक्षक असणार्या सचिन कुंभार याने पाटण प्रेस नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर 15 डिसेंबरला अश्लिल व्हिडिओ क्लिप टाकली होती. पाटणमधील अनेक मान्यवर या ग्रुपचे सदस्य आहेत. त्यामध्ये महिलाही आहेत. त्यामुळे पाटण ग्रुपचे सदस्य महेंद्र तुकाराम चव्हाण (वय 51) यांनी पाटण पोलीस ठाण्यात सचिन कुंभार याच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी सचिन कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सचिन कुंभार हा फरार झाला होता. अखेर त्यालाल पाटण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे पुढील तपास करत आहेत.