महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा परशुराम विद्यालयाचा शालेय पोषण आहार वाटपासाठी अनोखा उपक्रम - सातारा

परगावावरून येणाऱ्या मुलांची वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे आणि ज्या विध्यार्थ्यांना वडील, भाऊ ,नातेवाईक नाहीत, अशा काही विध्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार वितरण करून विद्यालयाने सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

parshuram school try new way to grain distribute
हुतात्मा परशुराम विद्यालयाचा शालेय पोषण आहार वाटपासाठी अनोखा उपक्रम

By

Published : Apr 19, 2020, 2:45 PM IST

सातारा-कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहाराचे योग्य वाटप करण्याचे आदेश देण्यात करण्यात आले आहेत. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पालकांना आणि मुलांना हुतात्मा परशुराम विद्यालयाने शाळेत बोलावून वेगवेगळ्या दिवशी वाटप करण्यात आले. 1200 ते 1500 विध्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आला.

परगावावरून येणाऱ्या मुलांची वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे आणि ज्या विध्यार्थ्यांना वडील, भाऊ ,नातेवाईक नाहीत, अशा काही विध्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार वितरण करून विद्यालयाने सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

विद्यालयाचे प्राचार्य सुरेश औटे आणि उपप्राचार्य मिलिंद घार्गे यांनी सर्व सेवकांना पोषण आहार वाटप सूचना देऊन स्वतः सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि सॅनिटीझरने हात स्वच्छ धुऊन विध्यार्थ्यांना तांदूळ आणि विविध डाळींचे वितरण केले. जे विध्यार्थी वंचित होते त्यांना त्यांच्या घरी जाऊन तांदूळ आणि डाळ वाटप करून एक आदर्श समाजासमोर उभा केला.

विद्यालयातील क्रीडा शिक्षक आणि एन.सी. सी आधिकारी राजेंद्र जगदाळे यांनी गरीब गरजू होतकरू मुलांच्या घरापर्यंत स्वतःच्या दुचाकीवरून पोषण आहार पोहोच केला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यालयाला धन्यवाद दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details