सातारा- काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता भोगली. मात्र, विकासाचे राजकारण करण्याऐवजी त्यांनी फक्त मतांचे राजकारण केले. असा घणाघाती आरोप राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप महायुतीचे उमेदवार नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथील सभेत त्या बोलत होत्या.
काँग्रेसने विकासाचे राजकारण करण्याऐवजी फक्त मतांचं राजकारण केलं- पंकजा मुंडे - ELECTION
संविधान बदलण्याचं मी कधीच म्हणाले नाही. हा माझ्याविषयी खोटा प्रचार करण्यात येत आहे. गरिबांना पडलेले सुंदर स्वप्न नरेंद्र मोदी आहेत, असे पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी या वेळी भाजप सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. सर्जिकल स्ट्राईक करण्याच धाडस करत देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे. देशातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज आज सुरक्षित आहे. 450 कोटींची जलसंधारणाची कामं या भागात करण्यात आली आहे. 125 कोटी रस्त्यांसाठी दिले आहेत. अशी अनेक कामं या सरकारने केल्याच मुंडे यावेळी म्हणाल्या.
संविधान बदलण्याचा मी म्हटले नाही. हा माझ्याविषयी खोटा प्रचार करण्यात येत आहे. गरिबांना पडलेले सुंदर स्वप्न नरेंद्र मोदी आहेत, असे ही त्या वेळी म्हणाल्या.पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, मदनराव मोहिते पाटील, रासपचे मामूशेठ विरकर, शिवसेनेचे रणजित देशमुख यावेळी उपस्थित होते.