सातारा :महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ( Palangari Ready for Khandoba Mhalsa Marriage ) असलेल्या साताऱ्यातील पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेचा गुरूवारी मुख्य दिवस ( Khandoba Mhalsa Marriage Ceremony ) आहे. यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी पालनगरी सज्ज झाली ( Thursday is Main Day of Pilgrimage ) आहे. प्रशासन आणि पाल ग्रामपंचायतीने भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन वर्षानंतर खंडोबाची यात्रा निर्बंधाविना होत आहे. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने भाविक यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Khandoba-Mhalsa Marriage Ceremony : खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी पालनगरी सज्ज; गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ( Palangari Ready for Khandoba Mhalsa Marriage ) असलेल्या साताऱ्यातील ( Thursday is Main Day of Pilgrimage ) पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेचा गुरूवारी मुख्य दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या खंडोबा-म्हाळसा विवाह ( Khandoba Mhalsa Marriage Ceremony ) सोहळ्यासाठी पालनगरी सज्ज झाली आहे. प्रशासन आणि पाल ग्रामपंचायतीने भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षानंतर खंडोबाची यात्रा निर्बंधाविना होत आहे.
मंदीर परिसर, वाळवंटाची स्वच्छताखंडोबा यात्रा भरणारे नदीचे संपूर्ण वाळवंट तसेच मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गातील तात्पुरत्या पुलाचे काम बांधकाम विभागाच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना जागेचे वाटप करण्यात आले असून वाळवंटामध्ये पिण्याच्या पाण्याचे 50 नळ काढण्यात आले आहेत. स्वच्छता गृहाचीही सोय करण्यात आली आहे.
यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरबांधकाम विभागाच्या सहकार्याने पाल गावातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. सर्व मार्गांवर विद्युत वितरण कंपनीने लाईटची व्यवस्था केली आहे. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यात्रेवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, देवस्थान कमिटीच्या बैठकीत यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. शदोन वर्षानंतर खंडोबाची यात्रा निर्बंधाविना होत आहे. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने भाविक यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता आहे.