महाराष्ट्र

maharashtra

पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार' जाहीर

By

Published : Feb 11, 2020, 11:20 AM IST

साहित्य समीक्षक व ख्यातनाम भाषा शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma Shri Ganesh Devi
पद्मश्री डॉ. गणेश देवी

सातारा- साहित्य समीक्षक व ख्यातनाम भाषा शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कराड तालुक्यातील उंडाळे येथे 18 फेब्रुवारीला होणार्‍या 37 व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात डॉ. देवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा -मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, 20 स्पोर्टबाईक जप्त

नवी दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक व शेतकरी नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते डॉक्टर देवी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1976 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन आयोजित केले जात जाते. या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवंत, साहित्यिकांसह मान्यवरांनी उंडाळेमध्ये येऊन आपले विचार व्यक्त केले असल्याचे माजी मंत्री उंडाळकर म्हणाले.

स्वातंत्र्य सेनानी एन. जी. गोरे, श्रीमती उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मलाताई देशपांडे, जी. पी. प्रधान, प्रभाकरराव कुंटे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, डॉ. वसंतराव गोवारीकर, आण्णा हजारे, शांताराम गरुड ,निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, निळकंठ रथ, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह अनेक थोर विभूतीना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचेही उंडाळकर यांनी सांगितले.

डॉ गणेश नारायणदास देवी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाला आहे. ते बडोदा येथील भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत असून भारतातील बोलीभाषा व नष्ट होत चाललेल्या 780 भाषांवर त्यांनी संशोधन करून त्या भाषांना मान्यता प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. साहित्य अकादमीचा देश पातळीवरील मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भाषा शास्त्रज्ञ, विचारवंताला यंदा स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे माजी मंत्री उंडाळकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details