सातारा - पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तासाभराच्या खटपटीनंतर गळती थांबविण्यात यश मिळाल्याने टँकर सुरक्षितपणे कोल्हापूरकडे रवाना झाला.
हेही वाचा -'मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडले'
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ऑक्सिजनचा टँकर अचानक थांबला. यावेळी टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. चालकाने तासभर खटपट केल्यानंतर गळती थांबविण्यात यश मिळाले.
महामार्गावर पाचवडजवळ टँकरला गळती लागल्याचे सांगण्यात येते. साताऱ्याजवळ आल्यानंतर चालकाच्या ही गोष्ट लक्षात आली. टँकर ओव्हरलोड असल्याने गळती लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द