सातारा -शहरातील ठिकठिकाणी अस्वच्छ व घाणीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरिकांना विविध साथीच्या रोगांनी पछाडले आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबातील कोणी ना कोणी साथीच्या रोगाचा बळी ठरला असतानाही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा शहर व परिसरात मोठ्याप्रमाणावर फैलाव झाला आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांनी पछाडले आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ देताच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव
सातारा शहरातील ठिकठिकाणी अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य परसले आहे, यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ देताच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव
ग्रामीण भागात तसेच शहरातील विविध ठिकाणची गटारी स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी, झाडेझुडपे काढणे, गटारीवर पावडर मारणे, पावसाचे पाणी ज्या ठिकणी साचून राहत होते ते मुरवणे आदी कामे करणे गरजेचे होते. मात्र, ते झाली नाहीत. त्यामुळे कोरेगाव, माण, खटाव फलटण भागात रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णाला बेड सुद्धा शिल्लक नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली तरी आरोग्य विभाग अजून ही याकडे लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे.