कराड (सातारा) -बांगलादेश मुक्ती लढ्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर उपक्रम घेतले जाणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश मुक्ती लढ्याच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - Congress leader Prithviraj Chavan latest news
बांगलादेश मुक्ती लढ्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर उपक्रम घेतले जाणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम
इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना १९७१ ला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेशची निर्मिती केली. बांगलादेश मुक्ती लढ्याला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने, या घटनेच्या स्मरणार्थ कॉंग्रेसच्या वतीने देशभर उपक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह, श्रीमती किरण चौधरी, उत्तम कुमार रेड्डी, मेजर वेद प्रकाश, शर्मिष्ठा मुखर्जी, कॅप्टन प्रवीण डवर पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.