सातारा - किचनमध्ये सर्वाधिक लागणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे कांदा ! ऐन सणासुदीच्या तोंडावर या कांद्यानं गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणलंय. साताऱ्याच्या किरकोळ बाजारात कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे.
कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी, दराने केली शंभरी पार - शेतकरी
किचनमध्ये सर्वाधिक लागणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे कांदा ! ऐन सणसुदीच्या तोंडावर या कांद्यानं गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणलयं. साता-याच्या किरकोळ बाजारात कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे.
परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. पावसाने नव्या कांद्याचे कुजून नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचा दर वाढला आहे. यामध्ये साठवण करुन ठेवलेल्या जुन्या कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. साताऱ्याच्या किरकोळ बाजारात कांदा ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. 5 किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक आता अर्धा-एक किलोच खरेदी करत असल्याचे समर्थ भाजी मंडईतील विक्रेते संजय पवार यांनी सांगितले. हा दर दिवाळीपर्यंत स्थिर राहणार असल्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात लोणंदच्या गारव्या कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. लोणंद बाजार समितीमधील कांद्याचे प्रमूख व्यापारी बिपीनशेठ शहा यांनी सांगितले की, पावसाने नव्या कांद्याला फटका बसल्याने जुन्या कांद्याला भाव आला आहे. शेतकऱ्याने नवीन लागवड करून कांद्याचे पिक हाती येईपर्यंत तीन-साडेतीन महिने लागतील. साधारण फेब्रुवारीपर्यंत नवा कांदा बाजारात येईल, तोपर्यंत कांद्याचा भाव असाच चढता राहील.