सातारा - कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा सुमारे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. या लसीबाबत समाजमाध्यमांतून पसरलेला गैरसमज हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. दरम्यान मी स्वत: ही लस घेतली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोरोना लसींबाबत उठलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात एक हजार लाभार्थी लसीकरणापासून वंचित - सातारा कोरोना लसीकरण
कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा सुमारे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. या लसीबाबत समाजमाध्यमांतून पसरलेला गैरसमज हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. दरम्यान मी स्वत: ही लस घेतली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

१९ केंद्रांवर लसीकरण -
सातारा जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारी रोजी कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १०० लसींची ९ सेशन झाली. नंतर त्यात १९ पर्यंत वाढ करण्यात आली. आत्तापर्यंत ५ हजार ९०० लाभार्थ्यांना लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र त्यापैकी ४ हजार ८९१ लाभार्थ्यांनीच लसीकरण करुन घेतले. म्हणजे सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. काही लाभार्थ्यांना वेळेत मेसेज पोहचले नसल्याने ही तफावत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.