महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 31, 2021, 9:10 PM IST

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 1 हजार 872 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 35 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 35 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

corona positive satara
corona positive satara

सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 35 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.

फलटणचा आकडा घटता घटेना -

काल आलेल्या बाधितांमधे फलटण तालुक्यात सर्वाधिक 523 रुग्ण आढळले. तर जावळीत 76, कराड 140, खंडाळा 86, खटाव 204, कोरेगाव 92, माण 223, महाबळेश्वर 8, पाटण 125, सातारा 347, वाई 37 व इतर 10 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 66 हजार 256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 11 हजार 171 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 872 बाधित निघाले. जिल्ह्याचे आजचे बाधितांचे प्रमाण 16.76 टक्के इतके आहे.

21 हजार 412 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह -


आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 2, कराड 8, खंडाळा 1, खटाव 2, कोरेगाव 3, माण 5, फलटण 1, सातारा 11, वाई 2 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 677 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 21 हजार 412 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

2 हजार 369 नागरिकांना डिस्चार्ज -

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 369 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details