कराड (सातारा)- राज्याचे आणखी एक कॅबिनेट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर कराडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
राज्याच्या आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण; कराडमध्ये उपचार सुरू - Satara latest news
राज्याचे आणखी एक कॅबिनेट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर कराडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
![राज्याच्या आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण; कराडमध्ये उपचार सुरू राज्याच्या आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण; कराडमध्ये उपचार सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:24:59:1597467299-mh-str1anothercabinetministerofthestatecontractedcoronatreatmentataprivatehospitalinkarad-10037-15082020101540-1508f-1597466740-705.jpg)
कोरोनाची लागण झालेले कॅबिनेट मंत्री सातारा जिल्ह्यातील असून शुक्रवारी रात्री त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खासगी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच त्यांची तब्येत चांगली असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, मंत्री अनेकदा जनतेच्या संपर्कात येतात. तसेच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागात जाऊन जनजागृतीसाठी काम करताना दिसून येतात, परिणामी त्यांनाही कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.