सातारा(कराड) - पुणे येथून आलेल्या एका प्रवाशाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तपासणी झालेल्या इतर 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी रात्री साताऱ्यातील 40 आणि कराडमधील 64, अशा एकूण 104 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली.
कराडमध्ये कोरोनाचा आणखी एक रूग्ण; 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह - कराड कोरोना अपडेट
शुक्रवारी रात्री साताऱ्यातील 40 आणि कराडमधील 64, अशा एकूण 104 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तर पुणे येथून आलेल्या एका प्रवाशाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत एकूण १२९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 66 रूग्णांवर उपचार सुरू असून 61 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 आणि वाई ग्रामीण रुग्णालयातील 9, असे एकूण 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत एकूण १२९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 66 रूग्णांवर उपचार सुरू असून 61 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.