महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: साताऱ्यातील 'तो' व्यक्ती कोरोनाबाधित... एकूण आकडा 4 वर - कोरोना व्हायरस बातमी

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता एकूण 4 झाली आहे. रविवारी निष्पन्न झालेला बाधित 8 मार्चला टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून त्यावर मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत.

one-more-corona-positive-found-in-satara
साताऱ्यातील 'तो' व्यक्ती कोरोना बाधित...

By

Published : Apr 6, 2020, 10:34 AM IST

सातारा- क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दाखल असणाऱ्या संशयित रुग्णांपैकी एका 54 वर्षीय व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना बाधित रुग्ण हा सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील 14 वर्षांपासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता.

साताऱ्यातील 'तो' व्यक्ती कोरोना बाधित...

हेही वाचा-मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता एकूण 4 झाली आहे. रविवारी निष्पन्न झालेला बाधित 8 मार्चला टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून त्यावर मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले की, साताऱ्यात 4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. सांगली पोलिसांच्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील 25 ते 27 वयोगटातील 4 व्यक्तींना कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात, विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये 5 पुरुष व एक महिला अशा 6 जणांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यातील 30 वर्षांचा युवक हा बाधित रुग्णांचा निकट सहवासित आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका 67 वर्षांच्या व्यक्तीला देखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या सर्व 11 नागरिकांचा वैद्यकीय अहवाल यायचा आहे. या पूर्वी कोरोना बाधित असलेल्या 2 रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमूने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details