मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधताना सातारा : मुंबई-गोवा मार्गावरील (Mumbai Goa highway) एक लेन गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav) पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मुंबई-सिंधुदूर्ग रस्ता 'ग्रीन फिल्ड' केला जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण :मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई-सिंधुदूर्ग मार्ग होणार 'ग्रीन फिल्ड' :मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या पुर्णत्वासाठी प्रयत्नशील आहोत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई-सिंधुदूर्ग रस्ता आम्ही 'ग्रीन फिल्ड' करतोय. कोकणाच्या विकासासाठी हे महत्वाचे पाऊल तसेच कनेक्टिव्हिटी महत्वाची ठरणार आहे.
अनाधिकृत बांधकामाबाबत सक्त सूचना :सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे निसर्गाची हानी न करता पर्यटन विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता घेण्याची सक्त सूचना प्रशासनाला केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच :मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. अशा प्रकरणात आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीसाठी पूल मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत मागणीनुसार पाण्याचे टॅंकर दिले जातील. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा -
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री चार दिवस सुट्टीवर; साताऱ्यातील गावी दाखल
- CM helicopter break down : मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात इमर्जन्सी लँडिंग, महाबळेश्वर दौरा सोडून विश्रामगृहावर रवाना
- Watch Video : डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी; मंत्र्यांच्या पेहेरावाची सर्वत्र चर्चा
- Eknath Shinde on Thane Nashik Highway: मुख्यमंत्र्यांनी ठाणे-नाशिक महामार्गाची केली पाहणी, प्रशासनाला 'हे' दिले आदेश