कराड(सातारा) - रेल्वेची धडक बसून ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कराड रेल्वे स्थानकावर घडली. अशोक पवार (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेची रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू; कराड स्थानकावरील घटना - karad railway accident
कराड रेल्वे स्थानकावरील पोलीस शनिवारी सकाळी गस्त घालत असताना रूळाशेजारी त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
कराड रेल्वे स्थानक
कराड रेल्वे स्थानकावरील पोलीस शनिवारी सकाळी गस्त घालत असताना रूळाशेजारी त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मृत व्यक्ती मूळचा कोल्हापूरचा असून तो टेंभू (ता. कराड) येथील गुर्हाळावर मजूर होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार