सातारा - सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत धनगरवाडी येथील मयूर शिवतरे (वय 29) याचा खून झाला. तर रवी मोटे व योगेश मोटे यांच्या डोक्यात वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटने संदर्भात शिरवळ पोलिसांनी पंचायत समितिचे सभापती मारूती मोटेसह चौघांना ताब्यात घेतले आहे.
खंडाळ्यात किरकोळ वादातून एकाची हत्या, दोन जन जखमी - Satara latest news
सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत धनगरवाडी येथील मयूर शिवतरे याचा खून झाला. या प्रकरणाचा अधिक तपास शिरवळ पोलीस करत आहेत
![खंडाळ्यात किरकोळ वादातून एकाची हत्या, दोन जन जखमी one killed in minor controvercy in satara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5186846-750-5186846-1574790647474.jpg)
याबद्दल अधिक माहिती अशी की, धनगरवाडी येथील मोटे व शिवतरे यांच्यात काही दिवसांपासून किरकोळ वाद असल्याचे बोले जात होते. यातून यापूर्वीही एकमेकांविरुद्ध वादावादीचे प्रकार झाले होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास अनिकेत मोटे यास मयूर शिवतरे काही साथीदारांसह तू शिवीगाळ का केली याची विचारणा करण्यास मोटे वस्ती येथे गेला होते. यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये मयूर शिवतरेसह तिघे जण गंभीर जखमी झाले. मयूर शिवतरे यास शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात शिरवळ पोलिसात एक मेकान विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास चालू आहे.