सातारा - सदर बाझार येथील भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीवर नगरपालिकेने पारी संकुल बांधले आहे. दरम्यान आज, नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे स्थानिक रहिवाशाचा मृत्यू झाला. दत्तात्रय कदम (वय 50, रा. नगरपालिका निवासी संकूल, सदरबझार) असं मृताचं नाव आहे.
दत्तात्रय कदम सेंटरींगचे काम करत होते. सदर बाझार कालव्याजवळ भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीच्या जागेवर नगरपालिकेने एकात्मिक घरकुल योजना उभारली आहे. या निवासी संकूलात दत्तात्रय कदम हे कुटुंबासह राहतात. नळाला पाणी येत नसल्यामुळे या संकुलातील काही लोक टाकीवर चढून रबरी पाईपने घरात पाणी नेतात.
सदरबझारमध्ये इमारतीच्या स्लॅबवरुन पडून एकाचा मृत्यू
नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे स्थानिक रहिवाशाचा मृत्यू झाला.
व्यापारी संकुल
शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद-
टाकीत रबरी पाईप टाकून पाणी ओढण्यासाठी ते स्लॅबवर चढले होते. त्यावेळी पाय घसरून ते चौथ्यामजल्यावरुन खाली पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवले. मात्र तत्पुर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात 2,498 नवे कोरोनाबाधित