सातारा - पुलाच्या कठड्यावरुन चारचाकी गाडी खाली कोसळल्याने अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये म्हसवडचे मोबाईल व्यापारी अजिक्य ढोले हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जखमी झाले असून, या घटनेची नोंद पंढरपूर पोलिसात केली आहे.
म्हसवड-पंढरपूर रोडवर चारचाकी पुलावरुन कोसळली, एकाचा जागीच मृत्यू - पुलाच्या कठड्यावरुन चारचाकी गाडी खाली कोसळल्याने अपघात
पुलाच्या कठड्यावरुन चारचाकी गाडी खाली कोसळल्याने अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये म्हसवडचे मोबाईल व्यापारी अजिक्य ढोले हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जखमी झाले असून, या घटनेची नोंद पंढरपूर पोलिसात केली आहे.
म्हसवड (ता. माण) येथील अजिंक्य नंदकुमार ढोले, मनोज मुरलीधर भोजने व स्वप्निल भिमाशंकर टाकणे हे तिघेजण मंगळवारी (दि.१९) रोजी आपल्या कामानिमीत्त पंढरपूर येथे मारुती डिझाईर (क्र. एम. ०२ ए. एच.४९७८) या चारचाकी वाहनातून निघाले होते. त्यांची गाडी पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावानजीक आली असताना नदीच्या पुलावर अचानक समोरुन आलेल्या दुचाकीस वाचवण्याच्या नादात त्यांची चारचाकी पुलावर असलेल्या कठड्याला धडकली. त्यामध्ये सदरच्या पुलाच्या कठड्यावरील लोखंडी बार तुटल्याने डिझाईर गाडी पुलावरुन खाली कोसळली.
या अपघातामध्ये डिझाईर चालक - मालक अजिंक्य नंदकुमार ढोले वय (३०) यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यु झाला. तर त्यांच्या शेजारी बसलेला स्वप्निल टाकणे वय (२३ ) व पाठीमागे बसलेले मनोज मुरलीधर भोजने वय ( ५१ ) हे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची खबर म्हसवड शहरात समजताच अनेकांनी पंढरपुर येथे धाव घेतली अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार असुन शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
TAGGED:
4 whller collapse in bridge