महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा मृत्यू; 1 मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह, 2 मृतांचे नमुने तपासणीला - one case positive in satara

आत्तापर्यंत जिल्ह्यात 556 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 223 रुग्ण बरे झाले आहेत. तर 310 रुग्णांवर उपचार सुरु असून 23 जणांचा मृत्यू झालेला आहे.

one death in satara due to corona
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधिताचा मृत्यू

By

Published : Jun 2, 2020, 10:14 PM IST

सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जावळी तालुक्यातील वृद्धेचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या 23 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यावेळी माहिती देताना ते म्हणाले, की क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी (ता. खंडाळा) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. रांजणी (ता.जावळी) येथील मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या वृद्धेचा या पुर्वी मृत्यू झाला आहे. तो कोरोनामुळे असल्याचे आजच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
हडपसर पुणे येथून प्रवास करुन आलेला तरुण व मुंबईहून आलेला वेळेकामथी (ता. सातारा) येथील गृहस्थाचा मृत्यू प्रश्चात नमुना तपासणी करता पाठविला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 556 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 223 रुग्ण बरे झाले आहेत. तर 310 रुग्णांवर उपचार सुरु असून 23 जणांचा मृत्यु झालेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details