महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी; 'त्या' रुग्णाचा मृत्यू, 14 दिवसाचे रिपोर्ट होते 'निगेटिव्ह' - कोरोना व्हायरस बातमी

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, अकेजण कोरोनातून बचावले आहेत. तर काहींचा मृत्यू होत आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेले दोन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तो कॅलिफाेर्नियावरुन परत आला होता. त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.

one-dead-due-to-corona-virus-in-satara
one-dead-due-to-corona-virus-in-satara

By

Published : Apr 6, 2020, 11:27 AM IST

सातारा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण आढळायला सुरू झाले आहेत. त्यातच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यातच सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेले दोन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, अकेजण कोरोनातून बचावले आहेत. तर काहींचा मृत्यू होत आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेले दोन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तो कॅलिफाेर्नियावरुन परत आला होता. त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. या दाेन्ही रुग्णांचे पहिल्या 14 दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले हाेते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. आज त्यांचे 15 व्या दिवसासाठीचे नमूने पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडकर यांनी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details