सातारा -जिल्ह्यातील एका कोरोना बाधितासह चार कोविड संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण वरोशी (ता. जावली) येथील आहे. दोन संशयित रुग्ण कराड तालुक्यातील, तर एक पाचगणीचा आहे.
साताऱ्यात कोरोनाबाधितांचा आकडा २०४ वर.. एक कोरोनाबाधित आणि तीन संशयितांचा मृत्यू - satara corona
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०४ झाली आहे. गुरुवारी रात्री २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
साताऱ्यात एक कोरोनाबाधित आणि तीन संशयितांचा मृत्यू
लॉकडाऊनच्या आधी मुंबईहून उंब्रजमध्ये आलेल्या एका कुटुंबातील दोन महिन्याच्या बाळाचा आणि नांदलापूर (ता. कराड) येथील 65 वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 184 होती. परंतु, गुरुवारी रात्री 20 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे बाधितांचा आकडा 204 वर पोहोचला आहे.