सातारा - जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मलकापूर येथील 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह कोरोनावर मात केली आहे. या बाप-लेकीसह आगाशिवनगर आणि खोडशी गावातील दोन वृद्ध , अशा चौघांना सोमवारी कृष्णा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
बाप-लेकीची कोरोनावर मात; कृष्णा रुग्णालयातून चौघांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज - satara corona cured number
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी कृष्णा रुग्णालयातून चार कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये मलकापूर येथील 32 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या 2 वर्षीय मुलीसह 2 वृद्ध व्यक्तींनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कराडकरांना दिलासा मिळत आहे. सोमवारी कृष्णा रुग्णालयातून चार कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये मलकापूर येथील 32 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या 2 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. या बापलेकीसह 68 वर्षीय 2 वृद्ध पुरुषांनीही कोरोनावर मात केली आहे. सोमवारी त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयातून 34 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, राजेंद्र संदे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने टाळ्यांच्या गजरात या कोरोनामुक्त रुग्णांना निरोप दिला.