सातारा -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी सातारा जिल्ह्यात येणार आहेत. 25 नोव्हेंबरला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन करण्यासाठी ते येणार आहेत. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचलित सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सह्याद्री कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते संपन्न होणआर असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
यशवंतरावांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार सोमवारी प्रितीसंगमावर, कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे करणार उद्घाटन - सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी सातारा जिल्ह्यात येणार आहेत. 25 नोव्हेंबरला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन करण्यासाठी ते येणार आहेत. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचलित सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक-निंबाळकर, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी सहकार मंत्री प्रा. डॉ. एन. डी पाटील उपस्थित राहणार आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शरद पवार यांची सह्याद्री कारखान्यावर जाहीर सभाही होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती उद्योगाला अधिक विकसित करणार्या तंत्रज्ञान व संशोधनासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आवश्यक होते. ती गरज सभासदांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण केली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.