महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron In Satara : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, आफ्रिकेतून फलटणमध्ये आलेले 3 जण बाधित - फलटणमध्ये तीन जण ओमायक्रॉनबाधित

दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून फलटण येथे आलेल्या चौघांपैकी तिघांची ओमायक्रॉनच्या (Omicron variant in satara) चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर याच कुटुंबातील चौथी व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आली आहे.

Omicron variant in satara
Omicron variant in satara

By

Published : Dec 18, 2021, 5:44 PM IST

Updated : Dec 18, 2021, 5:58 PM IST

सातारा - दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून फलटण येथे आलेल्या चौघांपैकी तिघांची ओमायक्रॉनच्या चाचणीचा (Omicron variant in satara) अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर याच कुटुंबातील चौथी व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आली आहे.

चौथी व्यक्ती कोरोनाबाधित -

दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून आलेल्या एका चौघा जणांच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल हा ओमायक्रॉन बाधित (Omicron Corona new Variant)आला आहे. यातील तिसऱ्या व्यक्तीचा अहवाल अविश्लेष्नात्मक (unconclusive) आला होता. ती व्यक्तीही ताज्या अहवालामध्ये कोरोनाबाधित आढळली आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या होणार -

हे कुटुंब ज्या इमारतीत वास्तव्याला होते, त्या ठिकाणी राहत असलेल्या सर्वांच्या ओमायक्रॉनच्या (Omicron Corona new Variant) अनुषंगाने चाचण्या करण्यात येणार आहेत. संबंधित रुग्णांवर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या ओमायक्रॉनच्या अनुषंगाने चाचण्या करण्याचे आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.

प्रशासनाचे आवाहन -

कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. आवश्यकता नसताना घराच्या बाहेर पडू नये. त्यासोबतच मास्कचा योग्यरीत्या वापर करणे सुद्धा गरजेचे आहे. वारंवार हात धुणे ही काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच सामाजिक अंतर बाळगूनच वावरणे गरजेचे आहे, असे सुद्धा आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.

Last Updated : Dec 18, 2021, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details