महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State Sports Day Maharashtra: ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांची जयंती 'राज्य क्रीडा दिन' म्हणून होणार साजरी - महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन

पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्‍या दिवंगत खाशाबा जाधव ( Olympian Khashaba Jadhav Birth Anniversary ) यांची जयंती (दि. 15 जानेवारी) आता राज्य क्रीडा दिन ( State Sports Day Maharashtra ) म्हणून साजरी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या ( Maharashtra Olympic Association ) कार्यकारी सभेत हा ठराव झाला आहे. दिवंगत खाशाबांचे सुपूत्र रणजित जाधव ( Ranjeet Khashaba Jadhav ) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

खाशाबा जाधव
खाशाबा जाधव

By

Published : Jan 16, 2022, 1:10 AM IST

कराड (सातारा) - देशाला कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्‍या दिवंगत खाशाबा जाधव यांची जयंती (दि. 15 जानेवारी) ( Olympian Khashaba Jadhav Birth Anniversary ) आता राज्य क्रीडा दिन ( State Sports Day Maharashtra ) म्हणून साजरी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या ( Maharashtra Olympic Association ) कार्यकारी सभेत हा ठराव झाला आहे. दिवंगत खाशाबांचे सुपूत्र रणजित जाधव ( Ranjeet Khashaba Jadhav ) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांची जयंती 'राज्य क्रीडा दिन' म्हणून होणार साजरी
खाशाबांच्या सुपत्राने मानले आभार..

भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी व्हावी, यासाठी अनेक दिवसांपासून आम्ही प्रयत्नशील होतो. त्याला अखेर यश आले. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने खाशाबांचा जन्मदिन हा 'महाराष्ट्र क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया खाशाबांचे सुपूत्र रणजित जाधव यांनी व्यक्त केली आहे.

पद्म ऐवजी शिवछत्रपती, अर्जुन पुरस्कारावर बोळवण..

पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरव करावा, यासाठी आजअखेर देशभरातील कुस्ती संघटना आणि कुस्तीप्रेमी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, 1993 साली शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार (मरणोत्तर) आणि 2001 मध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार (मरणोत्तर) या पुरस्कारांनी खाशाबांचा गौरव झाला. तसेच खाशाबांच्या विजयाची आठवण म्हणून कोल्हापूरला विजयी मल्लाचे एक शिल्प घडवण्यात आले. खाशाबांचे जन्मगाव असलेल्या गोळेश्वर गावातील एका तालीम आणि कराडच्या कार्वे नाक्यावरील ऑलिम्पिक स्तंभाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या. खाशाबांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक मिळविण्यासाठी ५६ वर्षे लागली. मात्र, खाशाबांचे कुस्ती आणि ऑलिम्पिकमधील योगदान केंद्र सरकारच्या पातळीवर अदखलपात्रच ठरले आहे. कुस्तीप्रेमींना प्रतिक्षा आहे ती खाशांबाना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर होण्याची.

मरणोत्तर पद्म पुरस्काराच्या लढ्याला मिळाले बळ..

स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे सुपूत्र दिवंगत खाशाबा जाधव आजही मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. कराडमध्ये शनिवारी (दि. 15 जानेवारी) खाशाबांची जयंती साजरी झाली. प्रतिकूल परिस्थितीत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळवून देणार्‍या खाशाबांना केंद्र सरकारने मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, यासाठी देशभरातील कुस्तीगीरांचा पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकारि सभेत खाशाबांची जयंती महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय केला. यानिमित्ताने खाशांबाना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, यासाठी देशभरातील कुस्तीप्रेमी देत असलेल्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details