सातारा - शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून फिरस्ती वृद्ध महिला जागीच ठार झाली. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. गौडाबाई काळे (वय- ७५) असे महिलेचे नाव आहे. अपघातामुळे बसस्थानकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
सातारा बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्धा जागीच ठार - सातारा शिवशाही बसचा अपघात
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय- ७५) ही फिरस्ती वृद्ध महिला जागीच ठार झाली.
शिवशाही बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू
अपघाताचा तपास सुरू-घटनास्थळळावरुन मिळालेल्या माहितीनुसार सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईला जाणाऱ्या फलाटवरील शिवशाही बसच्या (क्र. MH-06-BW- 0642) चाकाखाली गौड़ाबाई काळे ही फिरस्ती वृद्ध महिला सापडली. या अपघातात ती जागीच ठार झाली. या घटनेचा पोलीस तपास करत असून नेमकी चूक कोणाची, हे समजू शकलेले नाही.