सातारा - जावळी तालुक्यात खाऊचे आमिष दाखवलून अल्पवयीन मुलीवर 65 वर्षांच्या वृद्ध नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65 वर्षे, रा. जावळी) या नराधमावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसह खेळत होती. तिला खाऊचे आमिष दाखवून नराधमाने तिला एका ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर मुलीला याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरुन मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित बबन उर्फ बबलींग जगन्नाथ सपकाळ यास अटक केली आहे.