सातारा - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अनेक दिवसांपासून बंदोबस्तासाठी रस्त्यावर आहेत. त्यांना सण नाही की आठवड्याची सुट्टी नाही. अशा ताणतणावाच्या वातावरणातसुध्दा ट्राफिक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस आवर्जुन साजरा केला. बंदोबस्ताच्या ठिकाणीच त्याला कॅडबरी भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यदक्ष २४ तास.. अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी बंदोबस्तावरच साजरा केला सहकाऱ्याचा वाढदिवस - लॉक डाऊन इफेक्ट
वाहतूक शाखेतील कर्मचारी सागर चव्हाण यांचा वाढदिवस असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी विकास बडवे यांना सांगितले. बंदोबस्ताच्या जागेवरून हालता येत नव्हते. तसेच लॉक डाऊनमुळे केक मिळणे शक्य नव्हते. म्हणून बडवे यांनी कर्मचाऱ्यांना कॅडबरी आणायला सांगितले. बडवे आणि कर्मचाऱ्यांनी सागर चव्हाण यांना कॅडबरी भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हातात मिळवणे टाळत हात जोडून शुभेच्छा दिल्या.
कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे हे वाहतूक कर्मचाऱ्यांसमवेत कराडमधील कोल्हापूर नाका येथे बंदोबस्तावर होते. वाहतूक शाखेतील कर्मचारी सागर चव्हाण यांचा वाढदिवस असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी विकास बडवे यांना सांगितले. बंदोबस्ताच्या जागेवरून हालता येत नव्हते. तसेच लॉक डाऊनमुळे केक मिळणे शक्य नव्हते. म्हणून बडवे यांनी कर्मचाऱ्यांना कॅडबरी आणायला सांगितले. बडवे आणि कर्मचाऱ्यांनी सागर चव्हाण यांना कॅडबरी भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हातात मिळवणे टाळत हात जोडून शुभेच्छा दिल्या.
दिवसा अथवा रात्री धिंगाणा करत भर रस्त्यात मित्रांचे वाढदिवस साजरे करण्याची फॅशन हल्ली वाढली आहे. असे असताना बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमाचा भंग न करता आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस रस्त्यावर साजरा केला. या अनोख्या पध्दतीने मिळालेल्या शुभेच्छांमुळे सागर चव्हाण यांचा आनंद द्विगुणित झाला.