सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५२ वर गेला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून सातारा शहर आणि आठ गाव पूर्णपणे बंद केले आहे. आज कराड तालुक्यातील ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 52; सरकारी रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांनाही लागण - कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५२ वर गेला आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून सातारा शहर आणि आठ गाव पूर्णपणे बंद केले आहे.
यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिका, एक कर्मचारी, खासगी रुग्णालयात प्रसुती झालेली एक महिला आणि मलकापूर- शिवनगरमधील एका पुरूषाचा समावेश आहे. यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ आणि सातारा जिल्ह्यातील संख्या ५२ झाली आहे.
जिल्ह्याच्या इतर भागाचा आढावा घेतल्यास महाबळेश्वर, वाई, माण, खटाव यामध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. या उलट सातारा, जावळी, फलटण, कराड, कोरेगाव, पाटण, खंडाळा या तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.