महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gangster Parvez Hanif Shaikh : कुख्यात गुंडाने स्पीड पोस्टाने पाठवले पत्र; मागितली ५० लाखांची खंडणी - कुख्यात गुंडाने स्पीड पोस्टाने पाठवले पत्र

येरवडा कारगृहात ( Yerawada Jail ) असलेल्या कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख ( Notorious gangster Parvez Hanif Shaikh ) याने कारागृहातून पत्र पाठवून लोणंदमधील गॅस एजन्सी मालकाला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Yerawada Jail
येरवडा कारगृह

By

Published : Sep 23, 2022, 11:47 AM IST

सातारा :येरवडा कारगृहात ( Yerawada Jail ) असलेल्या कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख ( Notorious gangster Parvez Hanif Shaikh ) याने कारागृहातून पत्र पाठवून लोणंदमधील गॅस एजन्सी मालकाला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


स्पीड पोस्टाने पाठवले पत्र :लोणंद येथील कुमार गॅस एजन्सीचे अमित घनश्याम तापडिया राहणार लोणंद, जिल्हा सातारा) यांच्या नावाने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून स्पीड पोष्टाद्वारे पत्र आले. तापडिया यांनी पत्र फोडून वाचल्यावर ते येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड परवेझ शेख याने पाठवले असल्याचे स्पष्ट झाले. परवेझ शेख हा चंदन सेवानी यांच्या हत्याकांडामध्ये येरवडा कारागृहात कारावासात आहे.


जमिनीच्या व्यवहारापोटी खंडणीची मागणी :गुंड परवेझ याने लोणंद येथील मल्हारी भंडलकर यांच्या मालकीच्या २७ एकर जमिनीचा किंमत ३० कोटी रूपये अनाधिकृत व्यवहार सुरळीत करण्यासाठी ५० लाख रुपये खंडणीची मागणी परवेझ शेख याने तापडिया यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याप्रकरणी तापडिया यांनी लोणंद पोलीस ठाण्यात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. लोणंद पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक गणेश माने गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details