सातारा - जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक वाढू लागले असून कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण गंभीर झाले आहे. जिल्ह्याच्या कोरोना संसर्ग वाढू नये, याबाबत काळजी घेण्यासाठी प्रशासनाने क्वारंटाईनबाबत कडक उपाय योजना करण्याची गरज आहे
सातारा जिल्ह्यात प्रवेश बंदी, नियम मोडल्यास कडक कारवाई - satara corona update
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमारेषेवर कुणीही विना पास आत येवू नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तरीही नागरिक पास नसतानाही जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

शंभूराज देसाई

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणेने काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी, असे कडक आदेश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.