महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : कोयनानगरच्या नेहरू उद्यानात शुकशुकाट; लाखो रुपयांच्या उत्पन्नाला फटका - Satara Nehru Udyan Latest News

पाटण तालुक्यातील कोयनानगरचे नेहरू उद्यान कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे उद्यान उभारण्यात आले होते. एरवी सतत पर्यटकांमुळे गजबजणारे उद्यान सध्या ओस पडले असून उद्यानात कमालीचा शुकशुकाट आहे. उद्यान बंद असल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या उत्पन्नाला सुमारे १५ लाखांचा फटका बसला आहे.

सातारा कोयनानगर नेहरू उद्यान न्यूज
सातारा कोयनानगर नेहरू उद्यान न्यूज

By

Published : Oct 1, 2020, 2:50 PM IST

Updated : Oct 1, 2020, 5:39 PM IST

कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील कोयनानगरचे नेहरू उद्यान कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे उद्यान उभारण्यात आले होते. एरवी सतत पर्यटकांमुळे गजबजणारे उद्यान सध्या ओस पडले असून उद्यानात कमालीचा शुकशुकाट आहे. उद्यान बंद असल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या उत्पन्नाला सुमारे १५ लाखांचा फटका बसला आहे.

कोयनानगरच्या नेहरू उद्यानात शुकशुकाट

कोयनानगर येथील कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पाचे काम १९६२ मध्ये पूर्ण झाले. या दोन्ही प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू कोयनानगरला आले होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोयनानगरमध्ये नेहरू मेमोरियल हॉल व नेहरू उद्यान उभारण्याची संकल्पना तत्कालीन नेते आणि कोयना प्रकल्पातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या एकमताने पुढे आली. त्यासाठी १७ एकर जागा उपलब्ध करण्यात आली. मेमोरियल हॉल आणि उद्यानासाठी त्या काळी शासनाने ४५ लाखांचा निधी दिला.

कोयना धरणाच्या पश्चिमेस नेहरू उद्यान आणि नेहरू मेमोरियल हॉल उभारण्यात आला. नेहरू उद्यानात जगभरातील वेगवेगळ्या जातीच्या, विविध रंगांच्या फुलांचा बगीचा करण्यात आला. मुलांना खेळण्यासाठी सीसॉ, मेरि-गो-राऊंड, घसरगुंडी, बंदिस्त घसरगुंडी, टेरेस गार्डनसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. या उद्यानाला पर्यटकांची पसंती मिळू लागली. वर्षाकाठी कोयना धरण व्यवस्थापनाला पर्यटकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले.

हेही वाचा -कोरोना काळात अतिक्रमणांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत तातडीने कारवाई करू नये-मुंबई उच्च न्यायालय

कोयना प्रकल्पाचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नेहरू उद्यानातील बंदिस्त ऑडिटोरियममध्ये 'कोयना प्रकल्पाची यशोगाथा' ही चित्रफीत पर्यटकांना दाखविण्यास सुरूवात झाली. शाळा, महाविद्यालयांच्या सहली कोयनानगरला येऊ लागल्या. त्यामुळे कोयनानगरमधील नेहरू उद्यान पर्यटकांचे आकर्षण बनले. परंतु, कोरोना महामारीचे संकट उद्भवल्यापासून नेहरू उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. बालगोपाळांसह पर्यटकांनी गजबजणार्‍या उद्यानात आता कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. उद्यान बंद असल्याने कोयना प्रकल्पाच्या उत्पन्नालाही मोठा फटका बसला आहे.

नेहरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. कोयना प्रकल्पाची उभारणी कशी झाली, याची माहिती देणारी चित्रफितही उद्यानातील ऑडिटोरियममध्ये दाखविण्यात येते. मुलांसाठी उद्यानात नवीन खेळणी बसविण्यात आली आहेत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेहरू उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दरमहा मिळणार्‍या तीन लाखांच्या उत्पन्नाचा फटका बसला असल्याचे कोयना प्रकल्पाचे शाखा अभियंता राजीव खंदारे यांनी सांगितले.

हेही वाचा -भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग

Last Updated : Oct 1, 2020, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details