सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांची नावे जाहीर केली. ( Nitin Patil as Chairman of Satara District Central Co-operative Bank ) निवडीच्या घोषणेनंतर वाई तालुक्यातील नितीन पाटील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सकाळपर्यंत या पदासाठी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले ( MLA Shivendrasinharaje Bhosle SataraBank Election 2021) यांची फेरनिवड होईल अशी चर्चा होती. ( Satara District Central Bank Election 2021 Sharad pawar) मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
उपाध्यक्ष पदासाठी अनिल देसाई यांचे नाव अंतिम केले. ( Satara District Central Bank Election 2021 ) बँकेचा अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांची नावे जाहीर केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. ( Ramraje Naik Nimbalkar on Satara District Central Bank Election 2021 ) त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र व आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची निवड झाली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयांमध्ये सर्व संचालकांची नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली. ( MP Udayan Raje Bhosale Satara District Central Bank Election 2021 ) यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.