रत्नागिरी - आधी जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करून दाखवा, मग नाणारचा अध्यादेश रद्द करा, असे वक्तव्य करत नाणार ऑईल रिफायनरीच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.
राणेंचा सेनेवर निशाणा : जैतापूरचा अध्यादेश रद्द करण्याचे दिले आव्हान
जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पावरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. शिवसेनेने सत्तेमध्ये असताना जैतापूर प्रकल्प रद्द करून दाखवला का? असा सवाल त्यांनी सेनेला विचारला आहे.
नितेश राणे
ते म्हणाले, जे जैतापूर रद्द करू शकले नाहीत ते नाणार काय रद्द करणार. नाणार फक्त ६ महिन्यासाठी बाजूला ठेवले आहे, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प नाणारवासियांच्या माथी मारणार, हे लोकांनी आताच समजावे. शिवसेनेने सत्तेमध्ये असताना जैतापूर प्रकल्प रद्द करून दाखवला का? खासदार विनायक राऊत यांनी वाटलेले पेढे हे जैतापूरसाठी होते की नाणारसाठी होते, याचा खुलासा राऊत यांनी करावा, असा पलटवारही राणे यांनी यावेळी सेनेवर केला.