महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात रविवारी आढळले 9 कोरोनाबाधित, कराडमधील पाच रुग्णांचा समावेश - साताऱ्यातील कोरोनाबाधितांची संख्या

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. कराडमधील कोरोनाबाधितांचा आकडा 93 वर पोहोचला आहे.

nine corona patient found in satara on sunday
साताऱ्यात रविवारी आढळले 9 कोरोनाबाधित

By

Published : May 18, 2020, 12:37 PM IST

सातारा - जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. कराडमधील कोरोनाबाधितांचा आकडा 93 वर पोहोचला आहे. बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्यांमुळे तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढत आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे दाखल असणारा आणि ठाणे येथून प्रवास करुन आलेला 26 व 67 वर्षीय पुरुष, मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली 32 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून दाखल असणारे 53 व 22 वर्षीय नागरिक अशा एकूण 5 जणांचे अहवाल रविवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात ९ वर्षाची मुलगी आणि कोरोनाबाधिताच्या निकट सहवासातील दोघांचा समावेश होता.

70 जणांवर उपचार सुरू -

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64 व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3 अशा एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 138 असून यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 70 आहे. 66 जण कोरोनामुक्त झाले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details