कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या स्मरणार्थ मलकापूरच्या नगरसेविका कमल कुराडे, त्यांचे पुत्र जयंत कुराडे आणि प्रशांत पाचुपते यांच्यातर्फे कोविड रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात विनामूल्य जेवण देण्यात येत आहे.
विलास पाटील-उंडाळकर यांच्या स्मरणार्थ आणि सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेतून कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या रूग्ण आणि नातेवाईकांना रात्रीचे जेवण हवे आहे, त्यांनी संपर्क केल्यास त्यांना विनामूल्य जेवण देण्यात येत आहे. मलकापूरच्या नगरसेविका कमल कुराडे यांचे पुत्र जयंत कुराडे आणि प्रशांत पाचुपते यांचे ढेबेवाडी फाट्यावर हॉटेल आहे. शासनाचे नियम आणि वेळेचे पालन करून सायंकाळी 7 ते 8 या वेळेत विनामूल्य जेवण दवाखान्यात दिले जात आहे. ज्यांना जेवण हवे असेल, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेविका कमल कुराडे, जयंत कुर्हाडे आणि प्रशांत पाचुपते यांनी सोशल मीडियावरून केले आहे.