महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 2 हजार 675 नवे रुग्ण, 33 मृत्यू - सातारा कोरोना आकडेवारी 27 मे

सातारा जिल्ह्यात काल 2 हजार 675 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 33 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 21 हजार 465 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

satara
सातारा

By

Published : May 28, 2021, 2:10 AM IST

सातारा - जिल्ह्यात काल (27 मे) 2 हजार 675 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

21 हजार 465 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

काल सातारा जिल्ह्यातील जावलीत 125, कराड 228, खंडाळा 135, खटाव 283, कोरेगांव 158, माण 131, महाबळेश्वर 15, पाटण 111, फलटण 1071, सातारा 343, वाई 64 व इतर 11 बाधित रुग्ण आढळले. आज अखेर बाधितांचा एकूण आकडा 1 लाख 58 हजार 36 वर पोहोचला आहे. 21 हाजर 465 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात 3 हजार 562 मृत्यू

काल 33 मृत्यू झाले. त्यात साताऱ्यातील 9, कराड 9, खटाव 8, कोरेगांव 4, माण 2 आणि खंडाळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या 3 हजार 562 झाली आहे.

1127 रुग्णांना डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले एकूण 1127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा -महाराष्ट्रात आज 21 हजार 273 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 425 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details